Dear All
I used to write poems since I was a kid. I remember a time when I was about 12 years old and me and one of my friend used to sit every evening, decide upon a subject and write poems. We used to churn out poems like a factory :-)
Times have changed and so have I. Becoming a mother has opened up lot of emotions in me. I write rarely these days only when emotions can not be contained. Here are some of my poems in Marathi.
Do let me know your feedback.
Love
Preeti
This poem is about our daughter, our life - Anushka.
सकाळी उठता दिसते चिमणी
माझ्या कुशीमधे शांत निजलेली
कुरळ्या केसांची झालर
निरागस चेहरायावर विस्कटलेली
आवाजाने तिच्या घर निनादते
चिवचिवाटाने तिच्या मन थबकते
विचार तिचे जगावेगळे भासतात
प्रश्नांचे भडिमार गगनाला भिडतात
डोळ्यातले आर्जव पाहून तिच्या
पावले थबकतात दारापाशी
हातात तिचा हात विरघळतो
मिठी तिची घट्ट गळ्याशी
शाळेत जाते काहीशी हिरमूसून
बसते बाईंच्या कुशीत दडून
शोधत राहते ओलावा मायेचा
पदर पकडून आईच्या आठवणीचा
खळखळणारे हसू तिचे
प्राण माझे जीवन माझे
निरागस डोळ्यातील कुतूहल तिच्या
कोणालाही भूलविल असे
खोडी सूचे क्षणा क्षणा
आपले करी मना मना
इवलासा लाघवी जीव तो
तिच्या वीणा सुना सुना
देवाची ही मजला भेट असावी का
गोडूली चिमणी, माझी अनुष्का
- प्रीति
This poem is about a day that all of us dream of living someday.
एक पहाट अशी यावी
लवकर उठायची घाई नसावी
घर कामाची दागदग नसावी
चहा पाण्याची सोय असावी
आन्घोळीची घाई नसावी
पाठीवरती धोपटी नसावी
ओफीसच्या विचारांची जळ्मट नसावी
एक पहाट अशी यावी
सुखाचा गारवा घेऊन यावी
पक्षांची किलबिल सुनवून जावी
एक दुपार अशी यावी
झोपायची पूर्ण मुक्ती असावी
दारावर कोणाची बेल नसावी
फोनची घंटा बंद असावी
एक दुपार अशी असावी
मनातला शीण उतरवून जावी
एक संध्याकाळ अशी यावी
जाईचा सुगंध बहरून जावी
कोणा आपल्याची चाहूल लागावी
प्रेमाने एक चौकशी व्हावी
दिवस भाराची कथा सांगवी
एक संध्याकाळ अशी यावी
गप्पांमधे रंगून जावी
एक रात्र अशी यावी
वाईट स्वॅप्नाना जागा नसावी
कुशी मधे पिल्लाची आस असावी
मिठी मधे प्रेमाची रास असावी
एक दिवस असा यावा
उत्साहाची सुमाने फुलवून जावा
आनंदाचे उधाण घेऊन यावा
समाधानाचे गुपित सांगून जावा
एक दिवस असा यावा
परत परत हवा वाटावा
पुन्हा पुन्हा जगावा वाटावा
एक दिवस असा यावा
काहीही असो पण मृगजळ नसावा
काहीही नसो फक्त अर्थपूर्ण असावा
- प्रीति
Monday, November 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
Excellent paintings and poems! And nice blog.
But then again, I may be biased :-)
Great Job Preeti!
Your paintings are truly excellent.
Poem is showing your internal feelings of an artist starving for free moments. ;-)
Keep it up. We are looking forward to see more and more.
It was a great start of a day with your blog!
Gandhali
You are so talented !!
Keep it up with your talent Preeti.
-Aparna
Hey Preeti,
Very touching poems and great painting!!
-Sheetal
Apratim Poetry and drawings! Ek diwas poetry, is truly a reflection of a perfect day everyone wishes. Keep up with the spirit of drawing and try keeping the poet in you alive.
Hey Preeti,
Amazing paintings and very touching poems. Thank you for sharing. Looking forward to more of these.
Kamini
Wow!! Very touching...Preeti thanks for sharing ..
Post a Comment